Skip to content Skip to footer

अनेक हुकूमशहांची नावे ‘M’ पासून सुरु होतात, राहुल गांधी यांचा नाव न घेता मोदींना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या ट्वीटवरून मोदी आणि राहुल गांधी समर्थक एकमेकांना सोशल मीडियावर भिडले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक लिस्ट जाहीर केली आहे आणि लिहिले आहे की, कित्येक हुकूमशहांचे नाव ‘M’ पासून कसे काय सुरू होते.

या दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून जगभरातील हुकूमशहांची नाव असलेली यादी जाहीर करण्यात आली आहे. या ट्विटमुळे चवताळलेल्या मोदी समर्थकांनी जोरदार टीका राहुल गांधी यांच्यावर केली होती. तसेच या टीकेला काँग्रेस समर्थकांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये एफ. मार्कोस (फिलीपींस), बी. मुसोलिनी (इटली), एस. मिलोसेविक (सर्बिया), हुस्नी मुबारक (इजिप्त), मोबुतू (कांगो), मिशेल मिकोमबेरो (बुरुंडी), परवेज मुशर्रफ (पाकिस्तान) यांच्या नावाचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला जात होता त्याच मुद्यावर शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

Leave a comment

0.0/5