Skip to content Skip to footer

उदयनराजे यांना तात्पुरता जामीन मंजूर

सातारा : गेले काही दिवसांपासून सातारा शहरापासून लांब असलेले खासदार उदयनराजे भोसले आज (सोमवारी) स्वत:हून पोलिसांत हजर झाले. आज सकाळी अकराच्या दरम्यान उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या वतीने न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आल्यामुळे न्यायालयाने उदयनराजेंना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांना सातारा न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी सात दिवसांनी पुन्हा सुनावणी होणार आहे.

उदयनराजेंचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील यांनी युक्तिवाद केला. उदयनराजे स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. 18 मार्चला घडलेल्या प्रकाराची 23 मार्चला नोंद झाली. या दोन दिवसांत काय घडले ते सर्वांना माहित आहे. फिर्यादी स्वत: चालत प्रतिभा रुग्णालयात दाखल झाला होता. तपासणीनंतर संपूर्ण व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचा भाग नसल्याचेच स्पष्ट होत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला त्यामुळे उदयनराजेंना तात्पुरता जमीन मिळाला.

Leave a comment

0.0/5