Skip to content Skip to footer

सलमान खान चं आई-वडिलांसाठी खास गाणं

मुंबई : 18 नोव्हेंबरला अभिनेता सलमान खान च्या कुटुंबात डबल सेलिब्रेशन होतं. कारण सलमानचे आई-बाबा सलमा खान आणि सलीम खान तसंच बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दिवशी सलमानने आपल्या आई-वडिलांना खास गिफ्ट दिलं.

सलमान खान ला सिनेमा आणि शोमध्ये गाताना यापूर्वी पाहिलं असेल.

आई-वडील आणि बहिण-मेव्हण्याच्या लग्नाच्या वाढदिवसालाही त्याने असंच काहीसं केलं. सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात तो माईकवर ‘जब कोई बात बिगड़ जाए’ गाणं गाताना दिसत आहे.

मुंबईतील या पार्टीत निवडक जवळचे लोक सहभागी झाले होते, ज्यात कतरिना कैफही होती.

अर्पिताच्या घरी ही पार्टी होती. पार्टीत युलिया वंतूर, मलाईका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्जा यांसारखे आणखी काही कलाकार सहभागी झाली होते.

अर्पितानेही पार्टीतला एक फोटो शेअर केला, ज्यात 53 आणि 3 लिहिलं होतं. पालकांसोबत अॅनिव्हर्सरी असल्याने आम्ही फारच कृतकृत्य झालोय. त्यांनी 53 वर्ष पूर्ण केली आणि आम्ही 3 वर्ष, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5