Skip to content Skip to footer

पंकजा मुंडेंच्या हस्ते न्यूयॉर्क मध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते न्यूयॉर्क शहरात भारताचे लोहपुरूष सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण झाले. यावेळी उपस्थित भारतीय व्यापा-यांनी ग्रामीण बचतगटांच्या उत्पादनांना अमेरिकेत हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची हमी ना. पंकजाताई मुंडे यांना दिली.

न्यूयॉर्क शहरात गुजराथी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे, याठिकाणी गुजराथी व्यापारी संघाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यापारी संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी अखंड हिंदुस्थान निर्माण करून भारतात एकता प्रस्थापित करणा-या वल्लभभाई पटेल यांचा भारतातील स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच असा पुतळा संपूर्ण जगाला एकतेची प्रेरणा देत राहील, असे गौरवोद्गार काढले.

Leave a comment

0.0/5