Skip to content Skip to footer

५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करा – भाजप नेत्याच ‘हा’ अजब सल्ला

नवी दिल्ली – योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करा, पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या असा अजब सल्ला दिला आहे. देशातील भ्रष्टाचाराला ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद केल्या तरच आळा बसेल असे या नेत्याने म्हटले आहे. राजभर यांनी याआधीही भाजपविरोधात काहीतरी वक्तव्य करून पक्ष अडचणीत आणण्याचे काम केले आहे. आता पक्षाच्या विरोधातील भूमिका घेत पुन्हा एकदा ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद कराव्यात असा सल्ला राजभर यांनी दिला आहे.

१ रुपया ते १०० रुपये एवढ्याच नोटा भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर चलनात ठेवण्यात याव्यात असाही सल्ला राजभर यांनी दिला.जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यांनी तेव्हा५०० आणि आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्णयानंतर २ हजाराची नोट मोदी सरकारनेच चलनात आणली. आता २ हजाराच्या नोटा आणि ५०० च्या नोटांवर बंदी आणली जावी अशी मागणी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5