Skip to content Skip to footer

जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे मूळ पाकिस्तानात आहे : पंतप्रधान

सिंगापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्व आशियाई शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमिरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी माईक पेन्स यांच्याशी चर्चा करताना २६/११ दहशतवादी हल्ल्यामध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने मूळ प्रवाहात आणण्याचे पाकिस्तानचे धोरण विश्वशांतीसाठी धोकादायक असल्याचे सांगितले.

यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी पूरक धोरणावर कडाडून टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘जगभरामध्ये झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचे मूळ हे आमच्या ‘शेजाऱ्यांकडे’ सापडू शकते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर परिषदेच्या तोंडावर पाकिस्तानला कात्रीत पकडण्यासाठी जोरदार हल्लबोल चढवला आहे.

Leave a comment

0.0/5