Skip to content Skip to footer

मी, दहशतवादावर तर ‘ते’ माझ्यावर हल्ला करताहेत: मोदी

नवी दिल्लीः मी, दहशतवादी संघटनांवर हल्ला करतोय तर विरोधक माझ्यावर हल्ला करत आहेत. सर्व विरोधक एकत्र येऊन मला लक्ष्य करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

गुजरातमधल्या वस्त्राल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, ‘विरोधकांनी मला लक्ष्य केले आहे. त्यांना मोदी नको आहे तर मला भ्रष्टाचार नको आहे. ते मोदींवर हल्ला करत आहेत तर मी दहशतवाद्यांवर हल्ला करत आहे.’

पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधी पक्षांना मोदींनी पुन्हा एकदा खडेबोल सुनावले. हवाई हल्ल्यामध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले, त्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी या हल्ल्याची सविस्तर माहिती मागितली आहे. कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह या काँग्रेस नेत्यांनी या कारवाईत नेमका किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्याचे आकडे जाहिर करण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी 250 दहशतवादी या कारवाईत मारले गेल्याचे म्हटले आहे.

मोदी म्हणाले, ‘मोदी किसान-कामागार हिताच्या सुरक्षेसाठी काम करत असून, आपण एकत्र येऊन गरीबी हटवू. मोदी हटाओ, मोदी हटाओ, अशा घोषणा दिल्या जात असल्या तरी मोदी चौकीदाराची खंबीर भूमिका निभावणार आहे.’

Leave a comment

0.0/5