Skip to content Skip to footer

मोदी यांचा विरोधी पक्षाला सल्ला मतदारांना मतदान कारण्यासाठी आव्हान करा.

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येणारा एप्रिल महिना हा निवडणुकीचा महिना म्हणूनच सर्व पक्ष पाहत आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधकांना सल्ला दिलेला आहे. मागील काही वर्षा पासून मतदान करायचा टप्पा देशात कमी झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे आव्हान करण्याचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधकांना केलेला आहे.

लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?

‘राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि एम के स्टॅलिन यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विरोधकांना उद्देशून ट्वीट केलं आहे. मागील काही वर्षा पासून देशात मतदान करणाऱ्या मतदारांचा टक्का कमी झलेला आहे आणि ही चिंतेची बाब आहे. भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या मतदान करण्याचा हक्क आपण बाजवलाच पाहिजे. हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना आहे.

Leave a comment

0.0/5