दक्षिण मध्य मुंबई मध्ये काँग्रेस पक्षात रस्सीखेच.

4Mungekar_20Gaikwad
आगामी लोकसभा निवडणुकीला दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना पक्षाचा उमेदवार निश्चित झालेला असताना अदयाप काँग्रेस पक्षाला उमेदवार देता आलेला नाही आहे. हा भाग म्हणजे मुंबईचा मध्य बिंदू म्हणून समजला जातो. याच भागात चैत्यभूमी, शिवसेना भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक हे याच भागात मोडत असल्यामुळे मुंबंईतील इतर लोकसभेच्या जागेपेक्षा जास्त महत्व प्राप्त झालेले आहे.
२००४ आणि २००९ ला दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी जिंकलेली होती. एकनाथ गायकवाड हे राहुल गांधी यांचे निकेटवर्तीय आणि गुजरात प्रभारी वर्षाताई गायकवाड यांचे वडील आहे.
आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या दांडग्या लोकांच्या सहवासामुळे आणि लोकहिताच्या कामामुळे तसेच धारावी प्रकल्प, बीडीडी चाळीचा पुर्नविकासाच्या प्रकल्पासाठी खासदार शेवाळे यांनी प्रयत्न केले आहे.

शिवसेना पक्षाच्या गट प्रमुखांची खा. राहुल शेवाळे यांनी उतरविला मोफत विमा…

आज ISO मानांकन मिळणारे राहुल शेवाळे यांचे कार्यालय हे देशातील पहिले खासदाराचे कार्यलय आहे. त्यातच भाजपा-शिवसेना युतीमुळे काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकलेले कालिदास कोळंबकर यांच्या तगड्या लोक जनसंपर्काचा फायदा सुद्धा राहुल शेवाळे यांना होणार आहे.आज याच भागातून उमेदवारी मिळण्यासाठी रिट.आयएएस खोब्रागडे, भालचंद्र मुगणेकर आणि एकनाथ गायकवाड यांच्यात रस्सीखेच चालू आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्षाने मध्य मुंबईत कोणाला उमेदवारी देणार हे अदयाप गुलदस्त्यातच ठेवलेले आहे. त्यामुळे नाव जाहीर केल्यावर काँग्रेस  पक्षा अंतर्गत गटबाजी वाढलेली दिसून येणार आहे. त्यामुळे दिल्लीतील केंद्रीय समिती काय निर्णय घेते त्यावरच तिघांचे भवितव्य अवलंबून आहे. परंतु गुजरात प्रभारी असलेल्या वर्षाताई गायकवाड हे आपल्या वडिलांचे म्हणजे एकनाथ गायकवाड यांच्या नावाची शिफारस करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here