Skip to content Skip to footer

युतीचा धर्म पाळण्यासाठी नारायण राणे यांच्यावर भाजपाचा दबाव…

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तथा भाजपा कोट्यातून खासदार झालेले नारायण राणे यांना भाजपा पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यासाठी दबाव बनवला जात आहे. काही दिवसापूर्वी राणे यांनी “मी भाजपचा खासदार असलो तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आपले पुत्र निलेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील” असे नारायण राणे यांनी जाहीर केले होते. परंतु असे असले तरी त्यांच्या मुलाने निवडणूक लढवू नये, यासाठी भाजपच्या नेतृत्वाने दबाव आणला आहे. यामुळे राणे कोणती भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांचे वर्चस्व आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपा पक्षा बरोअबर त्यांची जवळीक अधिकच वाढलेली होती. तसेच राणे हे भाजपा कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडणूक सुद्धा गेलेले आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा पक्षात झालेल्या युतीमुळे राणे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, महाआघाडीने सुद्धा राणे यांची भूमिका लक्षात घेता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडता काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. युती झाल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहणार, हे स्पष्ट झाले. युती झाल्यावर राणे यांनी, आपले पुत्र निलेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून लढतील, असे जाहीरही केले होते.

राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केल्यास त्यातून युतीत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण राणे भाजपचे खासदार असून, ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्यही आहेत. राणे आणि शिवसेनेत सख्य होणे अशक्यच. पण त्यांनी मुलाला उभे करू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. या दृष्टीने भाजपाने राणे यांच्यावर दबाव आणला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने राणे यांना तसे बजावल्याचे समजते. त्यामुळे राणे यांच्या पुढे पेच प्रसंग निर्णय झालेला आहे.

Leave a comment

0.0/5