Skip to content Skip to footer

रंगबदलू शिवसेना, तर पक्ष बदलू शरद पवार…

राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर रंगबदलू शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो टाकण्यात आलेला आहे. परंतु रंगबदलू शिवसेना म्हणून ज्या शिवसेना पक्षाला आज राष्ट्रवादी हिणवत आहे. त्या राष्ट्र्वादीने आपल्या पक्षाचा जन्म कोणत्या कारणामुळे झाला आहे आणि का? याचा विचार केला तर सर्व प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटतील. १९९९ मध्ये शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यावेळेस सोनिया गांधी या विदेशी असण्याच्या मुद्द्याची सुरुवात काँग्रेस पक्षाचे तत्कालीन बंडखोर नेते शरद पवार यांनीच केली होती. भाजपा हा मुद्दा लावून धरेल असे त्यांना वाटायचे. त्यांच्या विदेशी वादाच्या मुळाशी हे तिघेच होते. काँग्रेसने शरद पवार यांना पक्षातून हकालपट्टी केल्या नंतरच शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती.

शिवसेना आणि भाजपा पक्षात झालेल्या युतीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या सर्व अटी भाजपा पक्षाने मान्य केलेल्या आहे. आज मुंबई-ठाणे भागातील ५०० चौरस फूटा पर्यंत घरांना कर माफी, “नाणार जाणार” हे नाणार प्रकल्प ग्रस्थांना दिलेले वचन आज उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखविले आहे. या सर्व शिवसेना पक्षाच्या मागण्या मान्य झाल्यावरच हिंदुत्वादी मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेना पक्षाची युती झालेली आहे. परंतु राष्ट्र्वादीने काँग्रेसच्या सोनिया गांधीं यांच्यावर चिकलफेक करून आपल्या स्वार्थसाठी काँग्रेस बरोबर युती केली होती. तेव्हा शरद पवार यांना युती करताना सोनिया गांधी यांचा विदेशी मुद्धा लक्षात आला नव्हता का?

आज शिवसेना पक्षाला नाव ठेवण्या अगोदर आपल्या पक्षाचा इतिहास आणि भूगोल जर राष्ट्र्वादीने चाळून पहिला तर इतरांना नाव ठेवताना राष्ट्रवादी हजार वेळा विचार करेल. आज राष्ट्रवादी मध्ये नेते मंडळींना राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ अली आहे याचा अर्थ राष्ट्रवादी पक्षाला स्वतःचे असे काही भविष्य राहिलेले नाही आहे. त्यामुळे आपण आणि आपले कार्यकर्ते भाजपा आणि शिवसेना पक्षाच्या विरोधात करत असलेली बॅनरबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असलेली टीका महाराष्ट्रात आपण आपल्याच पक्षाचे हसू करून घेत आहे.

Leave a comment

0.0/5