Skip to content Skip to footer

खासदार राहुल शेवाळे यांना सर्वोकृष्ट खासदार पुरस्कार प्रदान

दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना पक्षाचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे यांना सर्वोकृष्ट खासदार पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. काही दिवसा पूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांच्या चेंबूर येथील कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले होते आणि आता सर्वोकृष्ट खासदार पुरस्कार भेटल्यामुळे आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. जलद तक्रार निवारण डिजिटल यंत्रणा आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी कार्यालयाला ( ISO ९००१) हे प्रमाणपात्र मिळालेले शेवाळे यांचे देशातील पहिले खासदारांचे कार्यालय आहे. याच कामाची दखल घेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा खासदारकीसाठी दक्षिण मध्य मुंबई मधून शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. शेवाळे यांनी मिळालेला पुरस्कार हा विभागातील प्रत्येक नागरिकांना अर्पण केलेला आहे असे सुद्धा शेवाळे यांनी बोलून दाखविले होते.

‘युनायटेड नेशन्स’ आणि ‘वर्ल्ड सेफ्टी फोरम’च्या वतीने शुक्रवारी दिल्लीत एका आलिशान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड सेफ्टी फोरमच्या वतीने पुरस्कार मिळविणारे राहुल शेवाळे हे महाराष्ट्रातले पाहिले खासदार ठरले आहेत. दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक मुद्दे संसदेत मांडले. पाच वर्षांत लोकसभेत ८५० हुन अधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार शेवाळे यांच्या प्रभावी संसदीय कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ या बहुमानाने त्यांना गौरविण्यात आले. दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात, केंद्रीय राज्यमंत्री के जे अल्फान्स यांच्या हस्ते हा पुरस्कार, खासदार शेवाळे यांना प्रदान करण्यात आला.

Leave a comment

0.0/5