Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांच्या खर्चात धरावा – भाजपा

आगामी लोकसभा निवडणुकीला मनसे नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्याच सभेचा भाग म्हणून दोन दिवसापूर्वी मनसेची नांदेड येथे सभा पार पडली होती या सभेला सुद्धा राज ठाकरे यांनी भाजपा पक्षावर सडाडून टीका केली होती. पर्णातू या सभेचा खर्च कोणत्या पक्षाच्या नावावर टाकायचा हीच निवडणूक आयोगाची पंचायत झालेली आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याची मागणी भाजपचे लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे सदस्य विनोद तावडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे आज पत्र पाठवून केली आहे.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही विनोद तावडे म्हणाले. राज ठाकरे यांचे स्टॅण्ड अप कॉमेडीचे शो सध्या सुरू आहेत. नांदेडला पहिला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅण्ड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशी टीकाही तावडे यांनी केली आहे. त्यामुळे राज ठाकरे ज्या मतदार संघात सभा घेतील त्या भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. त्याचा मुले हा खर्च सुद्धा त्याचा उमेदवारांच्या नावावर दाखवावा असे सुद्धा भाजपा पक्षाकडून बोलण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5