Skip to content Skip to footer

पवारांची राजकीय खेळी, भुजबळ तुरुंगात का गेले ते मी बोलणार नाही……

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपवर व्यक्तीद्वेषाचे राजकारणाचा आरोप करत निशाणा साधला. पवार म्हणाले, ‘भुजबळ तुरुंगामध्ये का गेले होते? ते मी बोलणार नाही, पण व्यक्तीद्वेषाचे राजकारण मी करत नाही.’ ते नाशिक येथे आयोजित सभेत बोलत होते. नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार नाशिक जिल्ह्यात आले होते. तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा साडाडुन टीका केली होती.

या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे प्रमुख आरोपी असलेले छगन भुजबळ यांच्या विषयी बोलण्याचे शरद पवार यांनी टाळले होते. ह्या घोटाळ्यात छगन भुजबळ तसेच सध्याचे लोकसभा उमेदवार समीर भुजबळ यांचे नाव या प्रकरणात अडकलेले होते. जेव्हा इडीने या प्रकरणाची चौकशी केली असतां प्रमाणाच्या बाहेर बे-हिशेबी मालमत्ता छगन भुजबळ यांच्या आणि परिवाराच्या नावे मिळालेली होती. म्हणूनच छगन भुजबळ यांच्यावर कारवाही होऊन त्यांना जेलची हवा सुद्धा खावी लागली होती. सध्या भुजबळ हे जामिनावर बाहेर आहे.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना आणि भाजपा पक्षावर टीका करताना आपल्या पक्षातील घोटाळेबाज नेत्यांवर का बोलत नाहीत. नाशिक मधील सभेला सुद्धा नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करताना छगन भुजबळ का? जेल मध्ये गेले, कोणत्या आरोपाखाली गेले, त्यांनी खरंच घोटाळा केला किंवा नाही या विषयी पवारांनी मौन बाळगले होते. म्हणूनच आज शरद पवार आपल्या पक्षातील घोटाळेबाज नेत्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना दिसत आहे. परंतु नाशिकची जनता खुप हुशार आणि सुज्ञ आहे ते एका घोटाळेबाज व्यक्तीच्या हातात कधीच सत्ता सोपवणार नाही असेच दिसते.

Leave a comment

0.0/5