Skip to content Skip to footer

अशोक चव्हाण, राज बब्बर यांचा राजीनामा सत्र…..

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्रांना सुरवात झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा फेटाळला असला तरी ते राजीनाम्यावर ठाम आहेत. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज सकाळी राजीनामा दिला. खाजगी वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचे प्रभारी राज बब्बर यांनीही राजीनामा आहे.

 

राजीनामा बद्दल बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी राजीनामा पाठवला असून आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेरबदलासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तसेच मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली होती. पण काँग्रेसला राज्यात हवे तसे निकाल मिळाले नाहीत. मी महाराष्ट्रातील या पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्यास तयार असल्याचे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले होते.

Leave a comment

0.0/5