Skip to content Skip to footer

एकलव्य प्रमाणे काम करणार – नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशेवर जागा मिळतील, याची मला खात्री होती. सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर माझा हा विश्‍वास आणखीनच दृढ झाला. ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा मला विश्‍वास होता. माझ्या या विश्‍वासाची अनेकांनी खिल्ली उडविली होती. मात्र, निकालानंतर त्यांचे आवाज बंद झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. पुढील पाच वर्षे केवळ देशहिताचा विचार करून मी एकलव्याप्रमाणे काम करणार असल्याचे ते म्हणाले.

गुजरातच्या जनतेच्या आशीर्वादासाठी येथे आलो आहे. गुजरातच्या जनतेचे आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. गुजरातच्या मातीला मी वंंदन करतो. गुजरातच्या जनतेनेच मला शिकविले, संस्कार दिले, त्याचाच आज मला खूप उपयोग होत असल्याचे मोदी यांनी भाजप कार्यालयातील बैठकीत सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला सुरत अग्निकांडा बद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी श्रद्धांजली वाहिली. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या पुतळ्यापासून त्यांनी भाजप कार्यालयापर्यंत रोड शो केला. कार्यालयाबाहेर झालेल्या गर्दीसमोर त्यांनी छोटेखानी भाषण केले. सुरतच्या घटनेनुळे कार्यकर्त्यांनी साधेपणाने त्यांचे स्वागत केले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचेही भाषण झाले. मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची त्यांनी प्रशंसा केली

Leave a comment

0.0/5