Skip to content Skip to footer

मोदी सरकारचा शपथविधी आज, ८ हजार लोक राहणार उपस्थित…..

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. भारतातील आणि विदेशातील मिळून ८ हजार लोकांच्या उपस्थितीत संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. नरेंद्र मोदींचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे.

या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला देश-विदेशातील पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे. शपथविधी मध्ये देशांचे प्रमुख, शांघाय संघटनेचे अध्यक्ष (SCO), किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशिअसचे पंतप्रधान उपस्थित राहतील. एकूण १४ देशांच्या प्रमुखांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती असेल.

तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातून माजी धावपटू पी.टी.उषा, माजी क्रिकेटपटू राहुल द्रवीड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि जिमनॅस्टिकपटू दीपा कर्माकर उपस्थित असतील उद्योग जगतातील अंबानी, अडानी आणि टाटा कुटुंबियांसह अन्य मोठ्या उद्योजकांना बोलवण्यात आले आहे. यात अजय पीरामल, जॉन चेबर्स आणि बिल गेट्स यांचा समावेश आहे.

Leave a comment

0.0/5