Skip to content Skip to footer

लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार आहे – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड यश मिळवले. त्यानंतर ३० मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १८ खासदार असलेल्या शिवसेनेला मंत्रिपद मिळाले.त्यातच आता शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार भावना गवळी यांना लोकसभेचं उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान,लोकसभेचे उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपाने मित्रपक्ष या नात्याने निश्चितपणे पूर्ण करायला हवा असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले. आहे.

भावना गवळी या शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार आहेत. सलग पाच वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. सध्या सलग पाचव्यांदा लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. पण, शिवसेनेच्या वाट्याला आलेले एकमेव मंत्रिपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांन बहाल केले. त्यामुळे भावना गवळी यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. मात्र, मंत्रिपदाची संधी हुकली तरीही, भावना गवळी यांना लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. भावना गवळींना हे पद मिळाल्यास, त्या लोकसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनण्याचा बहुमान मिळवतील.

Leave a comment

0.0/5