Skip to content Skip to footer

नेहरूंमुळेच काश्मीरचा एक तृतीयांश भाग भारताने गमावला – अमित शहा

काश्मीर मुद्धावरून पुन्हा एकदा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केलेली आहे. जम्मू-काश्मीरचा आज एकतृतीयांश भाग जो भारताकडे नाही आहे त्याला जबाबदार कोण असा सावल शहा यांनी उपस्थित केलेला आहे. ते शुक्रवारी राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काश्मीर मुद्द्यावरून माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.

जवाहरलाल नेहरू यांनीच काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस नेहमी आम्ही काश्मीरमधील जनतेला विश्वासात घेत नाही, अशी टीका करते. मात्र, हा निर्णय घेताना त्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांनाही विश्वासात घेतले नाही. त्यावेळी शस्त्रसंधीचा निर्णय कोणी घेतला, हे एकदा तपासून पाहावे. त्यामुळे काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवण्याच्या फंदात पडू नये, असा टोला सुद्धा काँग्रेस पक्षाला लगावला होता.

दरम्यान, आज अमित शहा यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला. या काळात सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. ही विधानसभा निवडणूक २०१९ च्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता असल्याची माहिती अमित शहा यांनी सभागृहाला दिली. आज काश्मीरच्या मुद्द्यांवर भाष्य करून शहा यांनी काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयावर बोत दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5