Skip to content Skip to footer

हमे चाहिये आझादी.. अजित पवारसे आझादी…. बारामतीच्या जनतेने दिल्या घोषणा

अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवलेल्या कार्यक्रमात संतप्त नागरिकांनी हमे चाहिये आजादी, राष्ट्रवादीसे आजादी… अजित पवारसे आजादी… राष्ट्रवादी नगरसेवकोंसे आजादी… अशा घोषणांनी नगरपरिषद कार्यालयाच्या पटांगणात बारामतीच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांच्या वादिवसाला बारामतीकरांनी घरचा आहेर दिला असेच म्हणावे लागेल.

बारामतीतल्या आमराई भागातील काही स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी नगरसेविका अश्विनी गालिंदे यांना फोन केला. तो फोन त्यांच्या पतीने म्हणजे कुणाल गालिंदे यांनी उचलला. त्यानंतर नागरिक आणि कुणाल गालिंदे यांच्यातल्या संभाषणाचं रूपांतर हमरीतुमरीत झालं आणि मग कुणाल गालिंदे यांनी, मी असाच नगरसेवक झालो नाही तर त्यासाठी पैसे फेकलेत, असे म्हटलं. मग संतापलेल्या आमराईतल्या लोकांनी आज दादांच्या वाढदिवशीच थेट बारामती नगरपरिषदेवर मोर्चा काढला.

 

लबाड कोल्हा पुन्हा कुई- कुई करू लागला….

या घडलेल्या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रवादी मध्ये तिकीट वाटपासाठी पैसे घेतले जातात हे आता पुन्हा समोर आलेले आहे. मोर्चावेळी नागरिक चांगलेच संतापलेले होते. आम्हाला पैसे दिल्याचा दावा करणे म्हणजे हा आमच्या समाजाचा घोर अपमान आहे. हा संविधानाचा अपमान आहे. या नगरसेवकावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.

आम्ही पैसे तर घेतलेच नाहीत पण आमच्या समाजातील ज्यांनी कुणी पैसे घेतले असतील त्यांच्या वतीने आम्ही आता आमच्या जवळील वस्तू विकून त्या नगरसेवकाने वाटलेले पैसे त्याला परत करतो… पण असे नगरसेवक राष्ट्रवादीने आमच्यावर लादू नयेत, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. आम्ही आता राष्ट्रवादीचा अन्याय सहन करणार नाही. गप्प बसणार नाही. कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळवूनच राहू, असं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.

37 Comments

Leave a comment

0.0/5