Skip to content Skip to footer

फडणीवसांचा खडसेंवर खळबळजनक आरोप..!!

फडणीवसांचा खडसेंवर खळबळजनक आरोप..!!

भाजपाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपाला आता खुद्द फडणवीसांनी उत्तर दिले आहे. मनीष भांगळे नव्हे तर एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर माझ्यामुळे नाही तर न्यायालयामुळे गुन्हा दाखल करावा लागला होता, असा खळबळजनक आरोप फडणवीसांनी लावला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा खडसे-फडणवीस यांच्यातील वाद रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही.

कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते. त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला. त्यामुळे खडसे यांचे पद गेले, असे फडणवीसांनी बोलून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5