Skip to content Skip to footer

सचिन सातपुतेंनी केली ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेची सुरुवात

सचिन सातपुतेंनी केली ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेची सुरुवात

महाराष्ट्र बुलेटिन : आमदार श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. सचिन सातपुते यांनी ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेची सुरुवात करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करून घेतले आहे.

सचिन-सातपुतेंनी-केली-लसी-Sachin-Satpute-Kelly-Lasiआमदार नितेश राणे यांच्या हस्ते व भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा उद्घाटन सोहळा पार पडला असून या मोहिमेअंतर्गत चंदननगर-खराडी भागातील हजारो नागरिकांना त्यांच्या घराजवळच आपले लसीकरण करता येणार आहे.

सचिन-सातपुतेंनी-केली-लसी-Sachin-Satpute-Kelly-Lasiलसीकरणासाठी परिसरातील नागरिकांची होत असलेली नाहक धावपळ या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे थांबणार असून सचिन सातपुतेंनी राबवलेल्या या उपक्रमामुळे लसीकरण केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष करून दिव्यांग बांधवांना याचा मोठा फायदा होत आहे.

चंदन नगर, खराडी भागात कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी सदरील मोहीम अतिशय महत्त्वाची ठरणार असून आपणही आपले लसीकरण केले नसेल तर आपल्या परिवार, हितचिंतक व मित्रांच्या सुरक्षेसाठी लसीकरण करून घ्या आणि आपली जबाबदारी पार पाडा.

Leave a comment

0.0/5