पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके

Mauli Katke - वाघोली

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली व परिसरातील भागात आता मनपाच्या माध्यमातून होणार टँकरने मोफत पाणीपुरवठा – ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके

पुणे महानगरपालिका हद्दवाढीनंतर वाढलेल्या लोकसंख्येमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परिसरातील सर्व नागरिकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. वाघोली गाव व आजूबाजूचा परिसर मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर पालक या नात्याने सदर भागाकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा योजना सुरू होईपर्यंत महानगरपालिकेच्या माध्यमातून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर (माउली-आबा) कटके यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना दिले.

दरम्यान पालिकेची पाणी योजना सुरू होईपर्यंत वाघोली व परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल व त्याबाबतची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येईल असे आश्वासन पुणे मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here