काय आहे Sarahah अॅप? तुमची ओळख गुप्त कशी राहते?

Sarahah-application-how-to-use-and-install
Sarahah अॅप

तंत्रज्ञान : sarahah या अॅपच्या लिंक्स सध्या फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार दिसत आहेत. यावरुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातली गोष्ट सांगू शकता, मात्र तुमची ओळख गोपनीय राहील. तुमच्या मनात
एखाद्याविषयी असलेलं प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही त्याच्यापर्यंत पोहचवू शकाल. आयडेंटिटी गुप्त राहत असल्यामुळे या अॅपवर अनेकांच्या उड्या पडत आहेत.

‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता.

Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन कराल?

गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन तुम्ही Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. iOS फाइल 22 एमबी,
तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही साईन इन करा.

तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची गंमत आहे.

संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल. त्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता. सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने हे अॅप तयार केलं आहे. हे सोशल मीडिया अॅप असून जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे.

Sarahah चे साइड-इफेक्ट काय आहेत?

मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
iOS – लिंक वर क्लिक करा
अँड्रॉइड – लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here