Skip to content Skip to footer

Samsung Galaxy j सीरिजचा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : सॅमसंगने Samsung Galaxy j सीरिजचा नवा स्मार्टफोन गॅलक्सी J7 प्लस थायलंडमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत 24 हजार 800 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विशेषता म्हणजे यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

या मेटल बॉडी फोनमध्ये व्हर्टिकल लेंस ड्युअल कॅमेरा आहे. ड्युअल कॅमेरामध्ये पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सेल, तर दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेल आहे. याशिवाय 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

तर होमबटणमध्येच एंबेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.

https://maharashtrabulletin.com/jio-phone-delivery-date/

या फोनमध्ये ड्युअल अॅप फीचर देण्यात आलं आहे. म्हणजेच तुम्ही या फोनमध्ये एकाच वेळी दोन व्हॉट्सअॅप चालवू शकता.

गॅलक्सी J7 प्लसचे फीचर्स :

  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन
  • 4GB रॅम, 32GB इंटर्नल स्टोरेज
  • 13/5 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 2.4GHz P20 हेलियो ऑक्टा-कोअर प्रोसेसर
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5