iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X : Apple event कसा पाहणार

apple event

मुंबई : अॅपलचा आगामी iPhone 8, iPhone 8 प्लस आणि iPhone X हे फोन लाँच होण्यासाठी काही तास उरले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.

फोनच्या लाँचिंगला काही तास उरलेले असतानाही या फोनच्या नेमक्या फीचर्सबद्दल सस्पेंस कायम आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, Apple iPhone X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस डिटेक्शन, एज टू एज डिस्प्ले आणि पहिल्यांदाच होम बटण नसेल.

iPhone 8 आणि iPhone 8 Plus या दोन्ही फोनसोबत हा फोन लाँच केला जाईल. कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे.

या फोनची किंमत अमेरिकेत 1000 डॉलर म्हणजे जवळपास 63 हजार 785 रुपये (कर, सेस वगळून) असण्याची शक्यता आहे.

https://maharashtrabulletin.com/apple-event-on-android-windows/

Apple Event कसा पाहणार

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 12 सप्टेंबर रोजी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक हे iPhone लाँच करतील. अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी 10 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. दरवर्षीप्रमाणे Apple च्या Website वर हा कार्यक्रम Live पाहता येईल.

लाँचिंगनंतर साधारणतः एका आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र iPhone 8 साठी 15 सप्टेंबरपासूनच प्री बुकिंग करता येईल. तर 22 सप्टेंबरपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल.

Apple Event मध्ये कोणते फोन लाँच होणार

iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X हे तीन फोन अॅपलच्या कार्यक्रमात लाँच होणार आहेत. Apple ने पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने iPhone X हा खास फोन लाँच केला जाणार आहे. कंपनीने पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने iPhone X ला नवं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी लाँच केलेल्या iPhone 7 पेक्षा या फोनमध्ये अपडेटेड फीचर्स असतील. फोनच्या डिझाईनमध्येही काही बदल अपेक्षित आहेत. तर iPhone 8 आणि iPhone 8 Plus ची बॅटरी लाईफ वाढलेली असेल. दरम्यान iPhone X हा कंपनीचा सर्वात महागडा फोन असेल, असं बोललं जात आहे.

iPhone 8 आणि iPhone 8 Plus चे फीचर्स

आयफोन 8 मध्ये 4.7 इंच आकाराची, तर आयफोन 8 प्लसमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन असेल. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन 8 प्लस साठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स असण्याची शक्यता आहे. मात्र या फोनच्या सर्व फीचर्सबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे.

अॅपल वॉच 3

या iPhone Event मध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X या फोनसोबत एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच 3 देखील लाँच होणार आहे.

Apple 4K टीव्ही

4K रिझोल्युशनसह अॅपल टीव्हीही या इव्हेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार या अॅपल टीव्हीमध्ये 4K रिझोल्युशनसह लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर असेल.

Apple iOS 11, Mac OS High Sierra, Apple Watch OS 4

iPhone, MacBook आणि  Watch साठी iOS नवी अपडेट या Apple Event मध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here