Skip to content Skip to footer

बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय? का करतात बॉल टॅम्परिंग?

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटीत (चेंडूशी छेडछाड) बॉल टॅम्परिंग केल्याचं समोर आलं आणि अवघं क्रिकेटविश्व ढवळून निघालं. केप टाउन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जे काही केलं त्याला क्रिकेटमध्ये चीटिंग म्हटलं जातं.

बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड. क्रिकेटमधला हा एक गंभीर गुन्हा मानला जातो.

आपण आज जाणून घेऊया, की बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय, का केली जाते बॉल टॅम्परिंग, काय फायदा होतो त्यामुळे.

बॉल टॅम्परिंग म्हणजे चेंडूशी छेडछाड. म्हणजे चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करणं. गोलंदाजाची चेंडूवर योग्य पकड बसावी म्हणून चेंडूच्या शिलाईवर काही प्रयोग केले जातात.

https://twitter.com/FlyAirNZ/status/978844131823730688

चेंडूची शिलाई ढीली केली जाते. धातूच्या वस्तूने किंवा टेपच्या माध्यमातून चेंडूचा पृष्ठभाग किंवा आकार बदलल्याचे काही प्रकार क्रिकेटच्या मैदानावर यापूर्वी घडले आहेत. मैदानावरील मातीत चेंडू घासून अथवा नखांनी किंवा टणक वस्तूने छेडछाड करायचा बऱ्याचदा प्रयत्न केला जातो.

त्याचबरोबर चेंडूचा पृष्ठभाग बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वर्षांपूर्वी चेंडूला ग्रीस लावून त्याचा पृष्ठभाग बदलला जायचा. त्यानंतर काही वर्षांनी ग्रीसचा वापर बंद झाला, आणि च्युईंगम किंवा जेली बिन्स याप्रकारासाठी वापरल्या जाऊ लागल्या.

Leave a comment

0.0/5