Skip to content Skip to footer

विश्वविजेते पद थोडक्यात हुकले – भारतीय महिला संघाचा टी-२० विश्व चषक स्पर्धेत पराभव.

ऑस्ट्रेलिया येथे आयोजित महिला टी-२० विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा पराभव झाला. मेलबर्न येथे खेळाला गेलेला हा सामना अतिशय एकतर्फी पद्धतीने निकाली निघाला. सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन संघाने एकहाती सामना करत भारताला ८५ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रलिया संघाने २० षटकांमध्ये ८ गाडी बाद १८४ धाव केल्या, तर भारतीय संघाला १९.१ षटकांमध्ये सर्व बाद ९९ धावांचीच मजल मारता आली. भारतातर्फे कोणत्याही खेळाडू कडून महत्वपूर्ण अशी कामगिरी पाहावयास मिळाली नाही. एकूणच फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही विभागात भारतने अपेक्षापूर्वक कामगिरी दाखवली नाही.

ऑस्ट्रेलिया कडून एलेसा हिली (७५) व बेथ मुनी (७८) यांनी स्फोटक फलंदाजी करत विजयाची मुहूर्तमेढ रोवली.
एलेसा हिली हिने संपूर्ण स्पर्धे दरम्यान उत्कृष्ट खेळी करून सर्वोत्तम खेळाडूच्या खिताबावर आपले नाव कोरले.

Leave a comment

0.0/5