Skip to content Skip to footer

एका दिवसात तब्बल १ लाख रेल्वे लोकल पासची विक्री

कोरोनाकाळात बंद असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारी पासून सर्व सामान्य प्रवाशांकरीता सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सर्वच रेल्वे स्थानकावर असलेल्या तिकीट खिडकीवर एकच गर्दी दिसून येत होती.
त्यात सोमवारी एकाच दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तब्बल एक लाख सहा हजार ३८३ पासची विक्री झाली. तर २६ हजार ९५० जणांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली. तिकिटाबरोबरच पास काढण्यासाठी प्रवाशांची मंगळवारीही एकच गर्दी पास काउंटरवर केली होती.

लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलथा दिली असली तरीही लोकल प्रवासास परवानगी नसल्याने सर्वसामान्यांना पर्यायी वाहनाने कार्यालय गाठावे लागत होते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना सोमवारपासून सकाळी ७ च्या आधी, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ नंतर लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही पर्यायी वेळ अनेकांनी स्वीकारली असून तिकिटाबरोबरच पास काढण्यासाठीही अनेकांनी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीबाहेर रांगा लावल्या होत्या असेच चित्र सर्व स्थानकावर दिसून येत होते.

Leave a comment

0.0/5