Skip to content Skip to footer

पी. व्ही. सिंधू ला अगदी सहजपणे मजल मारण्याची संधी, मात्र सायनापुढं कठीण आव्हान

महाराष्ट्र बुलेटिन : आगामी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला अगदी सहजपणे मजल मारण्याची संधी चालून आली आहे. तर दुसरीकडे मात्र सायना नेहवालला पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा सामना करण्यासाठी सामोरे जावे लागत आहे.

ही स्पर्धा १७ ते २१ मार्च दरम्यान असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू पहिल्या फेरीत मलेशियाच्या सोनिया चिया सोबत भिडणार आहे. सिंधूने चांगली कामगिरी केल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिची अकाने यामागुची आणि उपांत्य फेरीत कॅरिलोना मारिनचाशी गाठ पडेल. विशेष म्हणजे सायनापुढे डेन्मार्कच्या मिआ ब्लिचफेल्डचे आव्हान असणार आहे.

‘आयपीएल’चे १४वे पर्व ११ एप्रिलपासून?

दरम्यान भारताच्या दोन जोड्या पुरुष दुहेरीमध्ये सहभागी होणार असून महिला आणि मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या प्रत्येकी तीन जोड्या खेळणार आहेत. विशेष म्हणजे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ३ मार्चपासून भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमधील कामगिरी कशा स्वरूपाची राहील हे देखील पाहिले जाणार असून ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी येथील कामगिरी ग्राह्य धरली जाणार आहे.

Leave a comment

0.0/5