मुंबई - परकीय गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने शेअर बाजारातील पडझड सलग पाचव्या सत्रात कायम आहे. सोमवारी (ता.२५) सेन्सेक्स मध्ये २९६ अंशांची घट झाली आणि तो ३१ हजार ६२६.६३ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. गेल्या महिनाभरातील निर्देशांकांची ही नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजार च्या निफ्टीनेही ९ हजार ९०० अंशांची पातळी तोडली आहे. निफ्टी ९१.८० अंशांच्या घसरणीसह ९ हजार…