Skip to content Skip to footer

शेअर बाजार – सेन्सेक्‍स महिनाभराच्या नीचांकावर

मुंबई – परकीय गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने शेअर बाजारातील पडझड सलग पाचव्या सत्रात कायम आहे. सोमवारी (ता.२५) सेन्सेक्‍स मध्ये २९६ अंशांची घट झाली आणि तो ३१ हजार ६२६.६३ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. गेल्या महिनाभरातील निर्देशांकांची ही नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजार च्या निफ्टीनेही ९ हजार ९०० अंशांची पातळी तोडली आहे. निफ्टी ९१.८० अंशांच्या घसरणीसह ९ हजार ८७२.६० अंशांवर बंद झाला.

जर्मनीमध्ये अंजेला मर्केल यांना सलग चौथ्यांदा कौल मिळाला असला तरी सत्ता स्थापन करताना कसरत करावी लागण्याची शक्‍यता असल्याने याकडे दुर्लक्ष करत परकीय गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. याआधीच्या चार सत्रांत सेन्सेक्‍सने ५०१ अंश गमावले आहेत. मुंबई शेअर बाजार त अदानी पोर्ट, कोटक बॅंक, लुपिन, टाटा स्टील, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आदी शेअर घसरणीसह बंद झाले. बांधकाम, हेल्थकेअर, भांडवली वस्तू, धातू आदी क्षेत्रात विक्री दिसून आली. शुक्रवारी परकीय गुंतवणूकदारांनी १ हजार २४१ कोटींचे शेअर विक्री केले.

शेअर बाजार – रुपयाचे अवमूल्यन सुरूच

चलन बाजारात रुपयातील अवमूल्यन सुरूच आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात ३१ पैशांचे अवमूल्यन झाले. दिवसअखेर तो डॉलरच्या तुलनेत ६५.१० च्या पातळीवर बंद झाला. रुपयातील अवमूल्यनामुळे आयातबिलामध्ये वाढ होणार आहे.

For More Information click here

Leave a comment

0.0/5