Skip to content Skip to footer

पाऊस आणखी वाढणार, कोकणात धुवांधार, राज्यभरात जोरदार!

मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहे. संपूर्ण कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्गात तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

रत्नागिरी, राजापूर, रांजा, रायगड या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

येत्या 24 तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

रत्नागिरीत धुवांधार

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. दापोली, खेडमध्येही दमदार पाऊस सुरु आहे.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. कुडाळ पावशी येथे बेलनदीवर पाणी आल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्या पूरसदृश्य स्थितीत आहेत.

दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील माणगाव- आंबेरी पुलावरून पाणी जात असल्यामुळे, 27 गावांचा संपर्क तुटला आहे.

https://maharashtrabulletin.com/mumbai-rains-pune-news/

पालघरमध्ये पाऊस

पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे,विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. मनोर, कासा ,चारोटी भागात पावसाचा जोर आहे.

कोल्हापूर

राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. दुपारी 12:30 वाजता राधानगरीचे 7 दरवाजे उघडल्याने त्यातून 12 हजार 200 क्युसेक पाण्याचा भोगावती नदीत वेगानं विसर्ग सुरू झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.  राधानगरीत चार तासात 80 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

सातारा

साताऱ्यातील  महाबळेश्वर, पाचगणी, कोयना येथे मुसळधार पाऊस तर दुष्काळी भाग – माण खटावमध्येही तुरळक सरी कोसळत आहेत.

जायकवाडी हाऊसफुल्ल

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीपत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने  येत्या 5 दिवसात मराठवाड्यात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणात 87.61 टक्के पाणी साठलं आहे.

विदर्भ

येत्या तीन दिवसात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5