Skip to content Skip to footer

फटाके वाजवण्यास मनाई करणाऱ्या तरुणाची हत्या

धुळे: फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. धुळे शहरातील मनमाड जीन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

दिनेश प्रल्हाद चौधरी असं मृत्यू झालेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

ऐन दिवाळी फटाक्यावरुन झालेल्या वादावादीत थेट तरुणाचा खून झाल्याने धुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे.  अशा क्षुल्लक कारणावर इतकं टोकाचं पाऊल उचलल्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिल्लीत फटाकेबंदी केल्यानंतर, महाराष्ट्रातही सरकारने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार अनेकजण प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी करत आहेत.

पण अनेकजण कोणतीही फिकीर न बाळगता कानठाळ्या बसवणारे फटाके फोडत आहेत. मात्र दिनेशनेही असेच फटाके फोडणाऱ्यांना मनाई करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये झालेल्या वादातून थेट दिनेशचा खून करण्यात आला.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5