Skip to content Skip to footer

पॉर्न अॅडिक्ट मुलाचा बापानेच कापला हात

पॉर्न (अश्लील चित्रफिती) पाहण्याच्या आपल्या मुलाच्या सवयीने त्रस्त झालेल्या पित्याने मुलाचा हात कापल्याची घटना तेलंगाणा राज्यात घडली आहे. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन ही माहिती दिली.

“माझ्या मुलाला स्मार्टफोनवर पॉर्न फिल्म बघण्याची सवय लागली होती. त्याला मी वारंवार असे न करण्याबद्दल सांगितले होते. तरीही तो ऐकत नसल्यामुळे त्याचा हात कापला,” असे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, असे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

मोहम्मद कय्युम कुरेशी असे या आरोपीचे नाव असून तो 45 वर्षांचा आहे. हैदराबादचा निवासी असलेला मोहम्मद हा व्यवसायाने खाटीक आहे सोमवारी तो पोलिसांसमोर हजर झाला आणि आपल्या मुलाचा मनगटापासून कोपरापर्यंतचा हात कापल्याची कबुली त्याने दिली. मोहम्मद खालिद कुरेशी असे त्याच्या मुलाचे नाव असून तो 18 वर्षांचा आहे. तो एका स्थानिक केबल टीव्ही ऑपरेटरकडे कामाला आहे.

https://maharashtrabulletin.com/radio-jocky-gave-birth-studio/

कय्युम कुरेशी याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अन्वये खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पहाडीशरीफ पोलिस ठाण्याचे निरीक्षक पी लक्ष्मीकांत रेड्डी यांनी सांगितले.

या घटनेनंतर त्याला त्वरित एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. खालिद याला अश्लील चित्रपट पाहण्याची सवय लागली होती त्याच्या वडिलांनी त्याला याकरिता वारंवार इशारा दिला होता.

रविवारी त्याच्या वडिलांनी त्याला असे पॉर्न चित्रपट पाहताना पकडले. सोमवारी याच विषयावरून दोघांमध्ये वादावादी झाली. त्या रागाच्या भरात कय्युमने कोयता घेऊन खालिदचा हात कापला असे पोलिसांनी सांगितले

Leave a comment

0.0/5