Skip to content Skip to footer

सुजय विखे पाटलांचा अखेर भाजपा पक्षात जाहीर प्रवेश

काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी वानखडे मैदानाच्या सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हातात भाजपाचा झेंडा घेऊन भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला नगर मधून सुजय विखे पाटलांच्या नावावर भाजपा पक्षाकडून शीकामोर्तब झाले आहे.

परंतु या कार्यक्रमाला खासदार दिलीप गांधी यांनी अनुपस्थिती दाखवून आपली नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी वडिलांची भूमिका निभावली आणि आता नगर मध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असे ही सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे नगर मधील राजकारणाची समीकरणे बदलेली आहे असेच बोलेल जात आहे.

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

 

सुजय विखे जिंकून येण्याची शक्यता असताना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरची जागा सोडण्यास नकार दिला, त्यामुळे सुजय विखे यांनी मोठा निर्णय घेत भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज मुंबईतील वानखडे मैदानाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात सुजय यांनी हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते.

आता मुलाच्या निर्णया बद्दल राधाकृष्ण पाटील यांना विचारले असता तो त्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो असे स्पष्टीकरण देण्यात आले होते. परंतु राधाकृष्ण पाटील हे काँग्रेस मध्येच राहण्याचा चर्चा रंगत आहे. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुलगा सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश टाळता येत नसल्यानं विखे पाटलांसमोर अडचण निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच नैतिकतेचा प्रश्न म्हणून पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण काय निर्णय घेतात हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5