Skip to content Skip to footer

असा खासदार अमेठीत नको आहे, राहुल गांधी यांच्या बालेकिल्यात धक्का

आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या भाषणात राहुल गांधींनी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचा आदरार्थी उल्लेख केला. त्यामुळे संपूर्ण देशात राहुल गांधी यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली दिसत आहे. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपा पक्षाला टार्गेट करताना “मसूद अजहरजी” असा आदरपूर्वक उल्लेख केला होता. जो आपल्या देशात कुरापती घडवितो. पुलवामा येथे झालेल्या हल्यात सुद्धा ज्या अतिरेक्यांचा हात आहे त्या दशहतवादी व्यक्ती विरुद्ध सम्मानपूर्वक शब्द काढल्यामुळे अमेठीत असा खासदार नको आहे असे पोस्टर लावण्यात आलेले आहे.

८६ वर्षीय मनमोहन सिंग उतरणार लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात

 

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी मोठी चूक केली. ‘पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या बसवर हल्ला कोणी केला? जैश-ए-मोहम्मद,मसूद अझहरने. ज्याला भाजप सरकारने सोडले. अजित डोवाल हे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत मग ते विमानात बसून मसुद अझरजींना सोडवण्यास कसे गेले होते?, असं म्हणत राहुल गांधींनी अझरचा आदरार्थी उल्लेख केला आणि स्वतःच ट्रोल झाले. आज पुहा राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आरोप लावून देशातील जनतेचा राहुल गांधी यांनी रोष ओढावून घेतलेला आहे.
आज राहुल गांधी यांच्याच लोकसभा मतदार संघात ‘दहशतवाद्याचा आदरार्थी उल्लेख करणारा खासदार अमेठीला नकोय. जो देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आणि दहशतवाद्याचा सन्मान करतो, असा खासदार अमेठीला मंजूर नाही… राहुल गांधी मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबाद”, अशा आशयाचा मजकूर पोस्टरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला राहुल गांधी यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करतात आणि दशहतवादी संघटनेचा म्होरक्या याचे नाव आदरपुर्वक घेतात त्यामुळे आपल्याच मतदार संघातील नागिरकांचा रोष राहुल गांधी यांनी ओढावून घेतलेला आहे.

Leave a comment

0.0/5