आम्ही दुसऱ्यांच्या पोरांचा सुद्धा विचार करतो-उद्धव ठाकरे

आम्ही आमच्या पोरांबरोबर दुसऱ्यांच्या पोरांचा विचार करतो अशी खोचक टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नाव न घेता केलेली आहे. सुजय विखे पाटलांच्या भाजपाच्या प्रवेशा नंतर आम्ही दुसऱ्यांच्या पोरांचा विचार करण्याची जबाबदारी घेतलेली नाही आहे असे मत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडले होते. त्यावर सडे-तोड उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

जलण्याच निर्णया बद्दल जे माझ्याकडे येतील ते सामोरा-समोर बसून निर्णय होईल त्यामुळे लवकरचं हा प्रश्न सुद्धा सुटणार अशीच सर्वांना अपेक्षा आहे. युतीत मिठाचा खडा कोणीच टाकू शकत नाही असे मत सुद्धा व्यक्त केले आहे.
अजून बरेच काही पत्ते खोलायचे बाकी आहे असे बोलून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. शरद पवार यांच्यावर भाष्य करताना शरद पवार हे अष्टपैलू आहे. नेता म्हणून चांगले आहे परंतु भविष्य कधी पासून सांगायला लागले. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सुजय विखे पाटील यांच्या आजोबाचा आम्हीच पराभव केला होता- शरद पवार

 

पार्थ पवार यांच्या बद्दल केलेल्या भाष्याच्या उलट ते वागले आहे. स्वतःची उमेदवारी मागे घेऊन पार्थ पवार यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे पवार बोलतात एक आणि करतात एक अशीच त्याची भूमिका राहिलेली आहे. यंदा तरी आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाही असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावावर होणाऱ्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळालेला आहे.

भाजपाच्या पोरांबरोबर आम्ही इतर पोरांचा सुद्धा विचार करतो. आम्ही दुसऱ्यांची पोर धुनी-भांडी करायला वापरत नाही असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here