मुंबई-रिलायन्स जिओने पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठा ‘धमाका’ केला आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) जिओने देशातील पहिला स्वस्त आणि स्मार्ट 4G फीचर फोन लॉन्च केला. विशेष म्हणजे जिओच्या 4G व्होल्ट फोनची इफेक्टीव्ह किंमत शून्य आहे. मात्र, यासाठी 1500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून कंपनीकडे ठेवावे लागतील. 3 वर्षांनंतर ते परत (रिफंड) केले जातात. 24 ऑगस्टपासून या फोनसाठी प्रीबुकींग करता येईल. सप्टेंबरपासून फोनची डिलिव्हरी मिळणार आहे.