Skip to content Skip to footer

रिलायन्स AGM, २०१७

जिओ फोनचे फीचर्स…
अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 4 वे नेव्हिगेशन, कॉम्पॅक्ट डिझाइन, फोन कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, 2.4”, QVGA डिस्प्ले, एसडी कार्ड स्लॉट, मायक्रोफोन अॅण्ड स्पीकर, हेडफोन जॅक, रिंगटोन्स, टॉर्चलाइट, एफएम रेडियो.

व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेसोबत अनेक फीचर आहेत. तसेच जिओच्या सर्व अॅप्स या फोनसमोत अगदी मोफत मिळणार आहेत. सोबतच लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच 22 भाषांचा समावेश करण्‍यात आल्याचे आकाश अंबानी यांनी माहिती दिली आहे.

अनलिमिटेड धनधनाधन प्लान केवळ 153 रुपयांत…
जिओने फोनसोबतच डेटा प्लानही लॉन्च केले आहेत. दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन 24 रूपयांत तर आठवड्यांचा प्लॅन 54 रूपयांत उपलब्ध करून दिला आहे. टीव्ही केबलचा प्लान 309 रूपये (प्रति महिना) असेल. त्याचप्रमाणे अनलिमिटेड धनधनाधन प्लान 153 रूपयांत उपलब्ध करून दिला आहे. एका आठवड्याला 50 लाख ग्राहकांपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचे रिलायन्सने लक्ष्य ठेवले आहे.

Leave a comment

0.0/5