जिओ फोन 15 ऑगस्ट रोजी रोल आऊट होईल. मात्र या फोनचं प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेन, त्यालाच अगोदर फोन मिळेल.
रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.