Skip to content Skip to footer

पुण्यात पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या

पुणे :पुण्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शनिवार पेठेत पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पराग क्षीरसागर (वय 30 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे.

आज सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (वय 60 वर्ष) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

https://maharashtrabulletin.com/kopardi-rape-murder-case/

महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांच्या हत्येनंतर मुलानेही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलं. मात्र त्याला वाचवण्यात आलं आहे. आरोपीला जुळा भाऊ असून तो देखील घटनेच्या वेळी घरातच होता.

आरोपी परागचे आई-वडील नोकरी करत होते. त्याला दारुचं व्यसन होतं. शिवाय तो काही कामही करत नव्हता. त्यातूनच त्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी पराग क्षीरसागरला ताब्यात घेतलं असून विश्रामबाग पोलिस पुढील तपास सुरु आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5