मध्यरात्रीपर्यंत उघडे राहतील बिअर बार, परमिट रूम, हुक्का पार्लर,वाइन शॉप

बार-Kingfisher-Beer-bar-closing-time

पुणे : राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंत परमिट रूम व  बिअर बार उघडे ठेवता येणार असून, रात्री १० वाजता बंद होणाºया  वाइन शॉपला दीड तास अधिक कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

नवीन नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंत परमिट रूम व  बिअर बार उघडे ठेवता येणार असून, रात्री १० वाजता बंद होणाºया  वाइन शॉपला दीड तास अधिक कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

राज्यपालांच्या आदेशाने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने राजपत्र प्रसिद्ध करून याची माहिती खुली केली आहे. पूर्वी रात्री १२ वाजेपर्यंत बिअर बार व परमिट रूम उघडे ठेवण्यास कायद्याने अनुमती देण्यात आली होती, तर मद्यविक्रीची दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवता येत होती. त्यातही अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून स्थानिक पोलिसांकडून परमिट रूम, वाइन शॉप चालकांवर दंडुकेशाही करून वेळेपूर्वीच आस्थापने बंद करण्यास भाग पाडले जात होते.

https://maharashtrabulletin.com/thackeray-movie-nawazuddin-siddiqui/

मुळात शासनाने परमिट रूम, बिअर बार, वाइन शॉप चालकांच्या परवाना शुल्कात दुप्पट वाढ केली असताना त्यात बंदचा कालावधी, पोलिसांच्या जाचामुळे परवडत नसल्याची भावना आस्थापना चालकांकडून व्यक्त केली जात होती. त्याचा विचार करून शासनाने नवीन नियम लागू केले आहेत.

नवीन आदेशानुसार महापालिका क्षेत्रात परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्कापार्लर, डिस्कोथेक आणि ज्या-ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केले जाते ते सकाळी साडेअकरा वाजता उघडण्यात येतील व रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, तर नगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सकाळी ११ वाजता उघडतील व रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहतील.

वाइन शॉप व मद्यविक्री करणारी महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी साडेअकरा वाजता उघडतील व रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू राहतील. नगरपालिका व अन्य क्षेत्रामध्ये मात्र सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतील. थिएटर आणि सिनेमा प्रदर्शित करणाºया गृहांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत अनुमती देण्यात आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here