Skip to content Skip to footer

विधानसभा उपसभापती निवडणुकीत युती कडून निलमताई गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा….

विधानसभा उपसभापतीची जागा रिक्त होत असून या जागेसाठी शिवसेना आमदार तथा प्रवक्ता निलमताई गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या निर्णया नंतर प्रथमच हा निर्णय दोन्ही पक्षा कढून घेण्यात आलेला आहे. याआधी काँग्रेसकडे असलेले विधानपरिषदचे उपसभापतीपद सध्या रिक्त आहे. त्यासाठी या अधिवेशनात निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या कामगिरीतून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या निलमताई गोऱ्हे यांच्या नावाने एका चांगल्या व्यक्तीची विधानसभा उपसभापती निवड होत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

सध्या सत्ताधारी भाजप शिवसेनेकडे संख्याबळ जास्त आहे. भाजपाचे २२, शिवसेनेचे १२, एक राष्ट्रीय समाज पक्ष याशिवाय ५ अपक्ष आमदार असल्याचा दावा सत्ताधारी यांनी केला आहे. तेव्हा सत्ताधारी यांचे ४० संख्याबळ होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी १७, कपिल पाटील यांचा लोकभारती, जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष, जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि कोकण शिक्षक मतदार संघाचे बाळाराम पाटील अपक्ष असे एकूण ३८ चे संख्याबळ विरोधी पक्षाकडे आहे. यामुळे उपसभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी यांचा उमेदवार निवडणून येणार हे स्पष्ट आहे. या जागेवर शिवसेनेच्या नीलम गो-हे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेस आघाडीकडून अजून कोणतेच नाव पुढे आलेले नाही.
काही दिवसावर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेना-भाजपा पक्षात झालेल्या युतीच्या फॉर्मुल्यामुळे विधानसभा उपसभापती निवडणुकीत युती कडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात अजून अधिकृत माहित समोर आलेली नाही आहे. राजकारणा बरोबर अनेक सामाजिक क्षेत्राच्या कामगिरीत नीलम गोऱ्हे यांचे नाव पुढे असते. आता उपसभापती पदी निवड झाल्यावर विधानसभेत आपल्या कार्याने कशी कामगिरी करतात हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.

Leave a comment

0.0/5