Skip to content Skip to footer

AbhinandanVarthaman अभिनंदन यांच्या स्वागतासाठी राष्ट्रभक्तांची वाघा सीमेवर गर्दी

वीर विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा वाघा बॉर्डरवर आहे. वायुदलाचं एक प्रतिनिधीमंडळ शुक्रवारी विंग कमांडर अभिनंदनला घेण्यासाठी वाघा बॉर्डरवर जाणार आहे. पाकिस्तानने एका संघर्षात अभिनंदनला ताब्यात घेतलं होतं. अभिनंदनचं मिग 21 विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हल्ल्यात जमिनीवर पडलं. त्यानंतर अभिनंदन पाकिस्तानात जाऊन पडला. अभिनंदनने पाकिस्तानचं एक एफ-16 लढाऊ विमान पाडलं होतं.

वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर आज भारतात येणार आहे. अभिनंदनच्या स्वागतासाठी नागरिक वाघा बॉर्डरवर येण्यास सुरुवात झाली आहे. अटारी-वाघा बॉर्डरवर लोकं तिरंगा घेऊन पोहोचत आहेत.
पाकिस्तानने गुरुवारी केली होती घोषणा

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदनची सुटका 3 वाजता होण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार अभिनंदनच्या सुटकेची वेळ अजून कळालेली नाही. अभिनंदनच्या सुटकेसाठी जोरदार मागणी होत होती. ट्विटरवर देखील अभिनंदनच्या सुटकेची मागणी जोर धरत होती. शेवटी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली.

Leave a comment

0.0/5