Skip to content Skip to footer

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण अखेर कोल्हापुरात भगवा फडकला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे अनेकदा दर्शन घेतले होते. कोल्हापुरात ते अनेकदा गेले होते, परंतु कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. या मतदारसंघात आपला खासदार असावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. ही इच्छा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अखेर पूर्ण झाली. कोल्हापूरचा गड शिवसेनेने सर केला आहे. एक नाही तर दोन खासदार निवडून आले आहेत. या दणदणीत विजयानंतर शिवसेना नेते-परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेऩा प्रमुखांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होत आदरांजली अर्पण केली आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी संपर्क नेते म्हणून रावते यांच्यावर सोपवण्यात आली होती.

\
कोल्हापुर मतदार संघात शिवसेनेने प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी दिलेली होती. तर हातकणंगले मतदार संघात धैर्यशील माने यांनी उमेदवारी देण्यात आलेली होती. तसेच युतीची पहिली जाहीर सभा ही कोल्हापुरात पार पडलेली होती. या कोल्हापूरच्या सभेला अंबाबाईचे दर्शन घेऊन युतीच्या दोन्ही जागा निवडून येऊ दे अशी प्रार्थना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली असे त्यांनी कोल्हापूरच्या सभेला बोलून सुद्धा दाखविले होते. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात सभा घेऊन स्वतः जातीने विशेष लक्ष घातले होते. या सर्व मेहनतीचा फायदा झालेला आज दिसून येत आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न कोल्हापुरात आज सत्यात उतरलेले दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5