Skip to content Skip to footer

अनुराग कश्यप यांच्या मुलीला ट्वीटरवरून धमकी

चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्या मुलीबाबत अश्लील वक्तव्य करत तिला धमकाविणाऱ्या विरोधात अंबोली पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले.

अनुराग यांची मुलगी आलिया हिच्याबाबत अश्लील टिष्ट्वट करत तिला धमकावण्यात आले होते. कश्यप यांनी रविवारी सायं. सहाच्या सुमारास अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी  त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. या प्रकरणी अंबोली पोलिसांचे सायबर खाते तपास करत आहे. संबंधित ट्वीटर अकाउंट हाताळणाऱ्याचा शोध सुरू आहे.

Leave a comment

0.0/5