Skip to content Skip to footer

महाराष्ट्र शासना तर्फे पर्यावरण दिन मोठ्या उस्साहात साजरा…….

५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून मुंबईतील यशवंतराव चव्हान सभागृहात दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, प्रविण पोटे-पाटील असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते. आज पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदार आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखणे सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. आज पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन १०० पेक्षाही जास्त सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत.

पर्यावरणाच्या स्वरक्षणसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सतत पुढाकार घेत असतात. काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्लस्टिक बंदीचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी ठेवला होता. पुढे तो एकमताने मंजूर होऊन महाराष्ट्रात “प्लास्टिक मुक्त राज्य” ही मोहीम राबवली गेली. या कारवाहीत कितीतरी लाखो टन प्लास्टिक पकडण्यात आले होते. २६ जुलै रोजी मुंबईत घडलेल्या घटनेला पूर्णपणे प्लास्टीकच जबाबदार होते अशी माहिती सुद्धा समोर आलेली होती. तसेच आज बीच क्लीनिग, पर्यावरण पूरक असे अनेक प्रोग्रॅम घेऊन जनतेमध्ये पर्यावरणा विषयी जनजागृती करण्याचे काम आदित्य ठाकरे करतच असतात.

Leave a comment

0.0/5