Skip to content Skip to footer

शेतकरी पीक विमा प्रश्नावर शिवसेना आक्रमक

शेतकरी पीक विमा प्रश्नावर शिवसेना आक्रमक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी पीक विमा प्रश्नी अडवणूक करणाऱ्या कंपनीविरुद्ध शिवसेनेच्या मोर्चाची घोषणा केली. हा मोर्चा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील कंपनीवर येत्या बुधवारी म्हणजेच १७ जुलै रोजी निघणार आहे. शिवसेनेचा हा मोर्चा शेतकरी मोर्चा नसून तो शेतकऱ्यांसाठी काढलेला मोर्चा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा मोर्चा केवळ एका कंपनीवर जाणार असला तरी तो सर्वच कंपन्यांना इशारा असेल असं शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकार बदललं तरी सरकारी यंत्रणा तीच आहे. यंत्रणेला जर आधीच्या सरकारची सवय असेल तर तसं चालणार नाही. यंत्रणा बदलण्याची आमची मागणी नाही मात्र यंत्रणा सुधारण्याची मागणी आहे. पीक विमा कंपन्यांना सरकारची भाषा समजत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत समजवावं लागेल. पीक विमा कंपन्यांनी शेतकरी पीक विमा संदर्भातील सर्व प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढावीत. अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. जसं कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दारावर बँकांची नोटीस लागते तसंच बँकाच्या दारावर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी लावण्यात यावी म्हणजे कोणत्या बँकेत किती कर्जमाफी झाली आहे ते कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी वारंवार मुंबईत यावं लागतं हे बरोबर नाही. शेतकऱ्यांप्रती आमचं ऋण आहे, ते व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आहे. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे असं मी वचन देतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

शिवसेनेला बळकटी आली, भगवे दिवस सुरु झाले -उद्धव ठाकरे

Leave a comment

0.0/5