Skip to content Skip to footer

महानगर पालिका अधिकारी गुन्हेगारासारखी वागणूक देत आहेत, खासदार बारणे यांच्याकडे तक्रार ….

कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत असताना तसेच बिलासंदर्भात राज्य सरकारचे सर्व नियम पाळत असताना सुद्धा महानगर पालिकेचे अधिकारी त्रास देत आहेत. तसेच गुन्हेगारासारखी वागणूक देत आहे अशी तक्रार पिंपरी-चिंचवडमधील खासगी हॉस्पिटलचालकांच्या शिष्टमंडळाने काल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे.

करोनाबाधितांवर उपचार करीत असलेल्या ग्लोबल, वात्सल्य, मेट्रो, लाइफ पॉईंट, स्पंदन, गोल्डन केअर, फिनिक्स, प्लस, जीवन ज्योती, ओझस, स्टार, अँपेक्स, भोईर आदी हॉस्पिटलच्या मालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोरील अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.

राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या अहवानानुसार आमच्या रुग्णालयाला पूर्ण कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले. कालावधीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. ऑक्सिजनचे शुल्क जास्त आहे. बिलांबाबत सरकारच्या नियमांचे पालन केले जात असताना पालिकेचे अधिकारी मानसिक त्रास देत आहेत. बिलांच्या ऑडीटसाठी १२-१२ तास बसवून ठेवले जाते. त्याचा कामावर परिणाम होत आहे. संबंधित अधिकारी आमच्यावर गुन्हेगारांसारखे वागतात. असे तक्रार खासदार बारणे यांच्याकडे केली. याबाबत तुमच्या समस्या शासन दरबारी मांडल्या जातील तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जाब विहंकारला जाईल अशी ग्वाही खासदार बारणे यांनी दिली.

Leave a comment

0.0/5